Meera Borwankar : … तो निर्णय दादांनीच घेतला, माजी पोलीस आयुक्तांकडून अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप
VIDEO | माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्याकडून नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्यासमोर अडचण वाढणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून नाव न घेता आरोप
पुणे, १५ ऑक्टोबर २०२३ | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून हे गंभीर आरोप करण्यात आले आहे. मॅडम कमिशनर या पुस्तकात तत्कालीन मंत्री दादा असा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असतानाचे हे प्रकरण आहे. 2010 मधील या प्रकरणाचा उल्लेख मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून केला आहे. येरवडा येथे पोलिसांची असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजित पवार यांचे थेट नाव घेतले नसले तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर रोख असल्याची चर्चा सध्या होताना दिसतेय.
Published on: Oct 15, 2023 01:36 PM