मविआ सरकारविरोधात बोलल्याने मला संपवण्याचा प्रयत्न, Gopichand Padalkar यांचा गंभीर आरोप
महाविकासआघाडी विरोधात आवाज उठवल्याने आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या षड्यंत्रामधून आटपाडी या ठिकाणी आपल्यावर वरीष्ठ पातळीपासून नियोजन करून हल्ला करण्यात आल्याचे आरोपही महाविकास आघाडी सरकारवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
महाविकासआघाडी विरोधात आवाज उठवल्याने आणि एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मला संपवण्यासाठी षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप,भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या षड्यंत्रामधून आटपाडी या ठिकाणी आपल्यावर वरीष्ठ पातळीपासून नियोजन करून हल्ला करण्यात आल्याचे आरोपही महाविकास आघाडी सरकारवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.
सांगलीच्या आटपाडी या ठिकाणी रविवारी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कार्यकर्त्यांच्या गटामध्ये जोरदार हाणामारीचे प्रकार घडला आहे. यामध्ये दोन जण किरकोळ जखमी तर दोन ते तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दहा जणांच्या वर गुन्हे दाखल झाले आहेत.या सर्व प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी महा विकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आपणा आवाज उठवत आहोत,आणि यातून आपल्याला रोखण्यासाठी संपवण्याच्या दृष्टीने षडयंत्र करून हा हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात एसटी आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उद्या 10 नोव्हेंबर रोजी एसटीचा मोठे आंदोलन आपण पुकारले आहे. त्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाऊ नये म्हणून आटपाडी मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून नियोजन रित्या आपल्यावर हल्ला करण्यात आला आहे,असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.