Breaking | सीरम इन्सिटूटचे CEO आदर पुनावाला गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
सीरम इनस्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी संसदेतील शाह यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्या कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा होऊ शकते. अमित शाह आणि आदर पुनावाला यांच्यामध्ये बैठक होणार आहे.
सीरम इनस्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी संसदेतील शाह यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. आदर पुनावाला आणि अमित शाह यांच्या कोरोना लस निर्मिती आणि पुरवठा यासंदर्भात चर्चा होऊ शकते. अमित शाह आणि आदर पुनावाला यांच्यामध्ये बैठक होणार आहे. आदर पुनावाला यांना सध्या सुरक्षा देण्यात आलेली आहे. सीरम कडून कोविशील्ड लस बनवण्यात येत आहे. तर, सीरमकडून इतर लसी देखील पुढील काही काळात तयार केल्या जातील. सीरम येत्या काही दिवसांमध्ये लहान मुलांसाठीची लस तयार करण्याची शक्यता आहे.