4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 4 October 2021
एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून एनसीबीच्या सूत्रांनुसार ते आर्यन खान, अरबाज मर्चेट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीची मागणी करतील.
एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते, मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे.