Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक, समुद्रात क्रूझवर ‘दम मारो दम’
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एका ड्रग्ज पार्टीत एनसीबीच्या हाती लागला आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरू झाली असून या रेव्ह पार्टीबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आहे. या तीन दिवसात जहाजावर काय होणार होतं? ही रेव्ह पार्टी कशी रंगणार होती? सूत्रांनी दिलेल्या हवाल्यामार्फत घेतलेला हा आढावा.
एनसीबी अधिकाऱ्यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती. आजच्या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याच माहितीच्या आधारे एनसीबी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित पाच आरोपींनाही उद्या नियमित न्यायालयात हजर केलं जाईल. त्यांचा नेमका रोल काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.