आज Friendship Day!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन मित्रांनी एकत्र यावं- शहाजीबापू पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं असलं तरी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे यांनी अजूनही एकत्रं यावं अशी भावना या आमदारांची आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली आहे. आज मैत्री दिन आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं असलं तरी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे यांनी अजूनही एकत्रं यावं अशी भावना या आमदारांची आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली आहे. आज मैत्री दिन आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आजच्या दिवशी मैत्रीभावनेतून एकत्रं यावं. या दोघांनी मिळून शिवसेना वाढीस न्यावी. शिवसेनेची भरभराट व्हावी. ही माझीच नाही तर प्रत्येक शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची, आमदार आणि खासदारांचीही अपेक्षा आहे. भगवंताच्या कृपेने हे घडून यावं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, असं आवाहन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले. शहाजीबापू पाटील मीडियाशी संवाद साधत होते.