महाराष्ट्र, गुजरातमध्ये जाणवणार ‘शाहीन’चा प्रभाव, वादळामुळे समुद्रात भरती येण्याची शक्यता
अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. गुलाबनंतर आता शाहीन या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्ये या शाहीन चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या वादळामुळे समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे. येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरात कोस्टगार्ड कडून मच्छीमारांना आवाहन करण्यात आलं आहे. खोल समुद्रात असलेल्या मच्छीमारांना किनार्यावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोस्ट गार्डच्या पाच बोटी अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. लहान आणि मोठ्या मच्छीमारांना किनाऱ्यावर येण्यासाठी आवाहन केलं आहे. पुढच्या 24 तासात अरबी समुद्रात मोठ्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीवरच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.