Special Report | Shahrukh Khanला ट्रोल करणाऱ्यांनो, मेंदू तपासून घ्या! -tv9

| Updated on: Feb 07, 2022 | 9:16 PM

शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

मुंबई – भारतरत्न लता मंगेशकरांनी रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर ही बातमी अखंड देशभर वा-यासारखी पसरली. निराश झालेल्या अनेक मान्यवरांनी मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात जाऊन अंतिम दर्शन घेतलं. तर काही मान्यवरांनी लता दीदींच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतलं, तसेच काही जणांनी शिवाजी पार्क परिसरात अंत्यविधीच्या आगोदर श्रध्दांजली वाहिली. अंत्यदर्शन घेण्यासाठी बाहेरून अनेकजण येणार असल्याने शिवाजी पार्क परिसरात कडक बंदोबस्त पोलिसांनी ठेवला होता. अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या शाहरूख खान आणि पूजा ददलानी सुध्दा आल्या होत्या. शाहरूख खान आणि पूजा ददलानी हे दोघेही स्टेजवरती पार्थिवाला श्रध्दांजली वाहण्यासाठी एकत्र चढले. पहिल्यांदा शाहरूख खानने प्रार्थना केली आणि वाकून पार्थिव शरिरावर फुंकर मारली, त्यानंतर पुजा दललानीसोबत हात जोडून प्रदक्षिणा घालून खाली स्टेजवरून खाली उतरला. हा व्हीडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला असून अनेक नेटक-यांनी श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

धनुष्यबाण हाताच्या नादी लागल्यापासून..,Jayant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्याने सभागृहात एकच हशा
Special Report | लता दीदींच्या अंत्यविधीला राजकीय संस्कृतीचं दर्शन! -tv9