Aryan Khan | आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, किल्ला कोर्टचा निर्णय

| Updated on: Oct 04, 2021 | 6:27 PM

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलीय. तसचं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर एनसीबीने त्याच्याबाबत एक दावा केला आहे. आर्यन खानच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह फोटो मिळाल्याचं एनसीबीने म्हटलंय.

अभिनेता शाहरुख खानला धक्का देणारं वृत्त मुंबई कोर्टातून समोर आलं आहे. कारण त्याचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आलीय. म्हणजे आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलीय. आर्यनला काल 1 दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. जी आज संपली. आज पुन्हा त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यावेळेस त्याच कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

आर्यन खान हा गेल्या चार वर्षापासून ड्र्ग्ज घेतो आणि त्याच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी केला होता. ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठीच आर्यनची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली गेली. ती कोर्टानं मंजूर करत आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली गेलीय.

Congress | लखीमपूरमधील घटनेनंतर काँग्रेसचं मुंबईत आंदोलन
Devendra Fadnavis | नुकसानग्रस्त भागात महाविकास आघाडी सरकारचं दुर्लक्ष : देवेंद्र फडणवीस