Video : मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला म्हणणं अयोग्य- श्रीमंत शाहू महाराज

| Updated on: May 28, 2022 | 4:33 PM

संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या मैदानात उडी घेतल्यानंतर त्यांनी अखेर माघारही घेतली. शिवसेनेने (shivsena) आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून संभाजीराजे प्रयत्नात होते. पण शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातल्याने संभाजीराजेंना राज्यसभेवर जाता आलं नाही. अपक्ष लढण्यावरच संभाजी छत्रपती अखेरपर्यंत ठाम होते. कोणत्याही पक्षात प्रवेश नको म्हणून त्यांनी अपक्ष लढण्यावरच भर दिला. संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेक तर्क […]

संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांनी राज्यसभेच्या मैदानात उडी घेतल्यानंतर त्यांनी अखेर माघारही घेतली. शिवसेनेने (shivsena) आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून संभाजीराजे प्रयत्नात होते. पण शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातल्याने संभाजीराजेंना राज्यसभेवर जाता आलं नाही. अपक्ष लढण्यावरच संभाजी छत्रपती अखेरपर्यंत ठाम होते. कोणत्याही पक्षात प्रवेश नको म्हणून त्यांनी अपक्ष लढण्यावरच भर दिला. संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अनेक तर्क लढवले गेले. छत्रपती घराण्याने कोणत्याही पक्षात प्रवेश करणं योग्य नसल्यानेच संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचं सांगितलं जात आहे. तर, राष्ट्रवादीकडून (ncp) निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेनेत प्रवेश करण्यात काय अडचण होती? असा सवालही केला जात आहे. तर, संभाजीराजेंना अपक्ष म्हणून राज्यसभेला उतरवण्याची खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच होती, असा गौप्यस्फोट संभाजी छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती महाजांनी केला. तसेच संभाजीराजेंना तिकीट न मिळणं हा छत्रपती घराण्याचा अवमान म्हणता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Published on: May 28, 2022 04:33 PM
Ravi Rana यांनी नागपूर पोलिसांचे मानले आभार
Nana Patole On BJP Troller | भाजपच्या ट्रोलरला चाराणे मिळतात पटोलेंची भाजपवर घणाघाती टीका