मुंबईत गाजलेल्या शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द

| Updated on: Nov 25, 2021 | 1:24 PM

बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक (Shakti mill) बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मुंबईः बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक (Shakti mill) बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

खोत-पडळकरांना महाराष्ट्रातील एसटी कामगार ‘आझाद’ करत आहे : गुणरत्न सदावर्ते
‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत