Shambhuraj Desai : राज्याच्या राजकारणात पुन्हा महाभूकंप? शिंदे सरकारच्या मंत्र्यानंच केला मोठा गौप्यस्फोट
VIDEO | राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे. शंभूराज देसाई यांनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटाच्या त्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळत आहे
सातारा, १६ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी वर्तवली आहे. शंभूराज देसाई यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट करत असं म्हटलं की, शरद पवार गटातील काही नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे आणि असं पण दिवाळी जवळ आली आहे. नवरात्र-दसऱ्याला आपण जोरदार धमाका करतो. तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. तसंच काहिसं घडू शकतं, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केले आहे. शंभूराज देसाई यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.