Eknath Shinde यांना Z+ सुरक्षा द्यायची ठरलं होतं पण…, संजय गायकवाड यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शंभूराज देसाई काय म्हणाले?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. गायकवाड यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शंभुराज देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे यांना z+ सुरक्षा द्यावं अस ठऱलं होतं पण...
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नक्षलवाद्यांच्या हातून एन्काऊंटर करण्याचा डाव होता, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यावेळी शिंदे यांना झेडप्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मातोश्रीवरून फोन आला. त्यांना सुरक्षा देऊ नका. याचा अर्थ काय आहे? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपलेले होते असंच ना? असा सवाही त्यांनी केला.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांना z+ सुरक्षा द्यावं अस ठऱलं होतं. एकनाथ शिंदे यांना दुसरी धमकी आली तेव्हा मंत्रलयात बैठक झाली होती. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचाही उल्लेख होता. यावेळी बैठकीत असं ठरलं होतं की, एकनाथ शिंदे यांना z+ सुरक्षा द्यावी, आणि एकनाथ शिंदेच्या कुटुंबियांना z सुरक्षा द्यायला हवी. असं ठरलं नंतर फाईल अंतिम मान्यतेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आली पण त्यांनी सीएम कार्यालयाकडून सुरक्षेबाबत निर्णय घेतला नाही. अधिवेशन संपलं त्यामुळे कोणताही निर्णय यासंदर्भात झाला नसल्याची वस्तुस्थिती असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले.