Shambhuraj Desai | परमबीर सिंह यांनी दिलेले पत्र ही स्टंटबाजी : शंभूराज देसाई
माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर परमवीर सिंग यांनी आरोपपत्र लिहिले आणि त्या संदर्भात त्यांना चौकशीला बोलवले असता याबाबतीत कुठलीच माहिती माझ्याकडे नाही असे सांगून पळ काढायचे काम परमबीर सिंह यांच्यासारख्या अधिकाऱ्याने केले आहे. असे राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत निकालाची प्रत आमच्या हातात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत निकाल प्रतीमध्ये न्यायालयाचे जे आदेश आहेत त्याचे राज्य सरकार आणि पोलीस दल पालन करेल. माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर परमवीर सिंग यांनी आरोपपत्र लिहिले आणि त्या संदर्भात त्यांना चौकशीला बोलवले असता याबाबतीत कुठलीच माहिती माझ्याकडे नाही असे सांगून पळ काढायचे काम परमबीर सिंह यांच्यासारख्या अधिकाऱ्याने केले आहे. असे राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.