Shambhuraj Desai हे पुन्हा आमदार नाही, आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ टीकेवर काय म्हणाले स्वतः शंभूराज देसाई?
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यापैकी काही निकाल समोर येत आहेत. पाटणमधील 26 पैकी 20 ग्रामपंचायतीवर मंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता, पाटणमधील ग्रामपंचायतीचा निकालावर मंत्री शंभूराज देसाई यांनी काय दिली प्रतिक्रिया
मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यापैकी काही निकाल समोर येत आहेत. पाटणमधील ग्रामपंचायतीचा निकालावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यातील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत आणि आत्ता १० ग्रामपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यातील ६ ग्रामपंचायतीचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायती आम्ही यंदा जिंकाल्या आहेत, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. जनतेनं विकासकामांच्या बाजूने कौल दिला आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात जी भूमिका स्वीकरली ती मतदारांना पटली असल्याने हे निकाल समोर येत आहे. म्हलारपेठ ग्रामपंचायत ही ठाकरे गटाकडे असलेली ग्रामपंचायत यंदा आम्ही ताब्यात घेतली आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः म्हाल्हारपेठला आले होते आणि सांगितलं होत त्यांनी की, शंभूराज हे पुन्हा आमदार होणार नाही त्याचं काय झाल? निकाल काय लागले पहा,,असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.