Shambhuraj Desai | नांदेड, मालेगाव, अमरावतीत निषेध मोर्चाला गालबोट, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका.
मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, असे आदेशच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना दिले आहेत.
शंभूराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हे आदेश दिले आहेत. सरकारने या घटनेची गंभीरपणे देखल घेतली आहे. पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. काही समाजकंटक वातावरण भडकवत असतात त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील काही शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजाचा माथी भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.