मुख्यमंत्रिपदावरून कुणी घातलं साकडं? बाप्पा कोणाचं ऐकणार? कोणाचा नेता मुख्यमंत्री होणार?

| Updated on: Sep 14, 2024 | 11:20 AM

सध्या गणेशोत्सव सुरू आहे, यादरम्यान, आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी गणपती बाप्पाला साकडं देखील घातलं जात आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं बाप्पाच्या चरणी घातलंय. तर अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आल्यात. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने आपापल्या नेत्यांसाठी मुख्यमंत्रीपदाचं साकडं घातलं जातंय. राजकीय विरोधक असले तरी मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भेट झाली. दोघांनीही एकमेकांना हसत खेळत विचारपूस केली आणि गणपती बाप्पांना आपपाल्या नेत्यासाठी मुख्यमंत्री व्हावे म्हणून साकडं घातलं. तर अंबादास दानवे यांनी शंभूराज देसाई यांची मागणी पूर्ण होणार नाही, असं म्हटलं आणि मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे होणार असा दावा केला. तर दुसरीकडे काँग्रेसच्या मेळाव्यातून खासदार प्रशांत पडोळे यांनी नाना पटोले हेच मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय. महायुतीचा विचार केला तर निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार आहे. पण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निकालानंतर हायकंमाड घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 14, 2024 11:11 AM