Shambhuraj Desai | राष्ट्रवादीकडून शब्द पाळला जात नाही, पराभवानंतर देसाईंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्याचा राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनी पराभव केल्या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना धारेवर धरले.
सातारा : शिवसेनेला सातारा जिल्ह्यात एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर जिल्यातील शिवसेनेला पर्याय खुले असल्याचे आणि आघाडी धर्म पाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण जर जिल्ह्यात शिवसेनेची अवहेलना होते असेल तर पक्ष प्रमुखांच्या परवानगीने आम्हाला सुद्धा जिल्ह्यात वेगळे निर्णय घेण्यासाठी परवानगी मागणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनी पराभव केल्या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना धारेवर धरले.