नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार, कुणी केली सडकून टीका

| Updated on: Nov 08, 2023 | 6:29 PM

अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडणार असल्याची शक्यता असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्तविली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचा नेता शरद कोळी यांनी नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असल्याचे म्हणत सडकून टीका केली.

मुंबई, ८ नोव्हेंबर २०२३ | अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडणार असल्याची शक्यता असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी वर्तविली आहे. इतकंच नाही तर त्यांनी हा त्यांच्यावर आरोप केलाय. या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचा नेता शरद कोळी यांनी नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असल्याचे म्हणत सडकून टीका केली. दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आज न् उद्या अडचणीत येणार, असल्याचे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. तर नितेश राणे बुद्धी भ्रष्ट झालेला भाजपचा आमदार असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचा घणाघातही त्यांनी केला. भाजपची सुपारी घेऊन नितेश राणे ठाकरेंवर आरोप करताय. उद्धव ठाकरे अशा खालच्या स्तरावर जात नसून तुम्ही गुन्हेगार आहात, असा हल्लाबोलही शरद कोळी यांनी केलाय.

Published on: Nov 08, 2023 06:29 PM
पुणेकरांनो गावाला जायचंय…नो टेन्शन, पुणे रेल्वे स्थानकातून दिवाळीसाठी 391 जादा रेल्वे धावणार
मुंब्र्यात कंटेनरमध्ये उभारली शिंदे गटाची शाखा, उद्धव यांना एकप्रकारे आव्हान कसं