Pawar Emotinal : पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या, कोणी कोणाची केली नक्कल?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने बारामतीत भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करताना आमदार रोहित पवार हे भावूक झाले. रोहित पवार भाषण करताना ढसाढसा रडले होते. तर आज बारामती विधानसभेचा अर्ज भरल्यानंतर अजित पवार काहिसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
घर विस्कळीत होतं तेव्हा भले भले कोसळतात. मग तरुण असोत की बुजुर्ग. राजकारणात तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या घरात दुफळी झाल्याचं ऐकायला येतं. त्यामुळे हे नेते भावूक झाल्याचंही पाहायला मिळतं. सत्ता आणि पदांचा हव्यास यामुळे हे होत असल्याचं दिसून येतं. अगदी मोठ मोठी घराणीही यातून सुटली नाहीत. महाराष्ट्रातील पवार घराणं असो की ठाकरे घराणं… घरात दुफळी झाल्यानंतर हे बडे नेतेही भावूक झाल्याचं पाहिलं. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबात अजितदादांनी बंड केलं. सवतासुभा मांडला. त्यामुळे पवार कुटुंबातील सर्वच हेलावले. लोकसभा निवडणुकीत रोहित पवार हे भरसभेत रडले. त्यांनी वेदनेला वाट मोकळी करून दिली. आता विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. अजितदादांनाही एका सभेत अश्रू अनावर झाले. लोकांना घर फुटलेलं आवडत नाही, म्हणून लोकसभेला घरातील उमेदवार द्यायला नको होतो, अशी कबुली देणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांवरच आपलं घर फोडण्याचा आरोप केला. यावेळी बोलताना अजित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तर शरद पवार यांनी अजितदादांची नक्कल केली. बघा पवारांच्या तीन पिढ्या जेव्हा भावूक झाल्या….