हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, पण नेमप्लेट कुणाची लागली?

| Updated on: Dec 06, 2023 | 4:23 PM

हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आले आहे. या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून वेगळ्या कार्यालयाची मागणी करण्यात आली नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारभार एकाच कार्यालयातून होणार

Follow us on

नागपूर, ६ डिसेंबर २०२३ : राज्य विधिमंडळाचे ७ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. या अधिवेशनाची जय्यत तयारी झाली असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यावरून खडाजंगी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आल्याचे समोर येतंय. या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून वेगळ्या कार्यालयाची मागणी करण्यात आली नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा कारभार एकाच कार्यालयातून चालणार आहे. मात्र या कार्यालयावर अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांची प्रतोद म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यालयात नेमप्लेट लावण्यात आली आहे. विधानभवन परिसरातील बराक क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादीचं कार्यालय आहे. पण विधानभवन प्रशासनाने अद्याप कुठल्याही एका गटाला अद्याप कार्यालय दिलं नाही, दोन्ही गटासाठी एकच कार्यालय आहे. दरम्यान, शिवसेनेत फुट पडली तेव्हा नागपूर विधानभवन परिसरात दोन वेगवेगळी कार्यालय देण्यात आली होती.