NCP Hearing : राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु असताना दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आज राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात महत्त्वाच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाने जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. यानंतर पुढील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाबाबत येत्या ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. तर घड्याळ हे चिन्ह दोन्ही पक्षाला वापरू देऊ नये, अशी शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कऱण्यात आली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी चर्चा झाली. यासंदर्भातील पुढील सुनावणी आता ६ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. कोर्टाने अजित पवार गटाला सगळीकडे घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर लावायला सांगितले होते. ते डिस्क्लेमर आधी न लावता आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणावर लावण्यात आले, असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला. यावरूनच सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला , 6 नोव्हेंबरपर्यंच प्रतिज्ञापत्र दाखल करा, असे निर्देश दिले आहेत. तर याबाबत अजित पवार गटाला नोटीसही देण्यात आली आहे.