Special Report | शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचा नरेंद्र मोदींविरोधात प्लॅन?
राष्ट्रीय पातळीवर जी काही राजकीय परिस्थिती आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावं आणि देशात पर्याय देण्यावर या बैठकीत चर्चा केल्याचं पवार यांनी सांगितलं. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे, असं आवाहनही पवारांनी यावेळी केलं आहे.
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबई दौऱ्यातील आपल्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेतेही उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण (National Politics) आणि भाजप विरोधातील आगामी रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती खुद्द ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच प्रादेशिक पक्षांना एकत्र करत देशात भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही यावेळी स्पष्ट दिसून आलं. वेस्ट बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं असोसिएशन आहे. काल त्यांनी राऊत आणि आदित्यची भेट घेतली. आज त्यांनी माझी भेट घेतली. राष्ट्रीय पातळीवर जी काही राजकीय परिस्थिती आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी त्या आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर सर्वांनी एकत्र यावं आणि देशात पर्याय देण्यावर या बैठकीत चर्चा केल्याचं पवार यांनी सांगितलं. जे लोक भाजपच्या विरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र यावे, असं आवाहनही पवारांनी यावेळी केलं आहे.