Sharad Pawar यांच्यासोबत काढलेल्या ‘त्या’ फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल, पवार म्हणाले…
VIDEO | राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेल्या अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेटीच्या फोटोवरून शरद पवार यांचा प्रफुल्ल पटेल यांनाच थेट सवाल?
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२३ | गेल्या चार दिवसांपूर्वीपासून सुरू असलेलं संसदेचे विशेष अधिवेशन काल संपलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे समोर आले होते. दरम्यान राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा अद्याप सुरूच आहे. दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशन काल शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल केला. शरद पवार म्हणाले, ‘राज्यसभेत काढलेला फोटो सोशल मिडीयावर शेअर का केला?’ या प्रश्नानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
Published on: Sep 22, 2023 12:31 PM