Kirit Somaiya on Deshmukh | अनिल देशमुखांना मुख्यमंत्री आणि शरद पवार वाचवत आहेत : किरीट सोमय्या

| Updated on: Sep 13, 2021 | 2:13 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आपल्या रडारवर असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. येत्या सोमवारी या दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचं नाही. कारण ही लूट आहे. मंत्री आणि सरकार शेरोशायरी करत असतील पण सोमय्या महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला जबाबदार आहे. त्यामुळे भुजबळांचे 120 कोटींची चोरी आम्ही पकडून दिली, असं सांगतानाच शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता तो राजमहल कुणाचा ते सांगा?, असा सवालही त्यांनी केला.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 13 September 2021
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची मालिका सुरुच, आता हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप