बारामती अॅग्रो प्लांटवर झालेल्या कारवाईवर शरद पवार एका वाक्यातच म्हणाले, ‘मी उत्तर…’

| Updated on: Sep 29, 2023 | 11:24 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामतीच्या अॅग्रो प्लांट कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केल्याची समोर आले आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे, काय दिली प्रतिक्रिया बघा...

Follow us on

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. काल रोहित पवार यांना ७२ तासांत प्लांट बंद करण्याची सूचना देण्यात आली आणि नोटीस देखील बजावली. यानंतर राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून द्वेष मनात ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या झालेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वाक्यातच उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, त्यावर मी उत्तर देणार नाही. रोहित पवार यांना रात्री २ वाजता या संबंधित नोटीस देण्यात आली होती. या झालेल्या कारवाईवर रोहित पवार यांनी स्वतः ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.