शरद पवारांनी माझा राजीनामा मागितला… एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करण्यापूर्वीच काय म्हणाले?

| Updated on: May 12, 2024 | 4:54 PM

'आता तरी मी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवार यांनी माझा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे मी आमदार राहणार आहे. त्यामुळे दुसरी निवडणूक लढण्याचा प्रश्न येत नाही. पवारांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा मागितला नाही. त्यामुळे....', एकनाथ खडसे काय म्हणाले?

Follow us on

आमदार एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी मला चांगली मदत केली. आता तरी मी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवार यांनी माझा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे मी आमदार राहणार आहे. त्यामुळे दुसरी निवडणूक लढण्याचा प्रश्न येत नाही. पवारांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा मागितला नाही. त्यामुळे इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तर यावेळी त्यांनी मोठी घोषणाही केली. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं नाही. पण माझा निवडणूक लढवण्यावर कल नाही. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे एकनाथ खडसे हे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.