अजित पवारांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल, दादांचे किती आमदार शरद पवार घेणार?

| Updated on: Jun 26, 2024 | 10:32 AM

भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवास केला. याच पक्षप्रवेशावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडवणारं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरू, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील कोणते आणि किती आमदार शरद पवारांकडे जाणार?

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या आमदारांना ग्रीन सिग्नल दिलाय. पक्षाला मदत होईल अशा सहकाऱ्यांना पुन्हा घेण्यास समस्या नाही, पण सरसकट घेणार नाही. तर पक्षांतील सदस्यांना चर्चा करून निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे अजित पवार यांचे कोणते आमदार शरद पवार यांच्याकडे जाणार यावरून चर्चा सुरू झाल्यात. भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवास केला. याच पक्षप्रवेशावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडवणारं वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता प्रश्न उरलाय तो म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील कोणते आणि किती आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार…? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 26, 2024 10:31 AM
येणाऱ्या काळात जरांगे की नही चलेगी…, गुणरत्न सदावर्ते यांनी काय केली सडकून टीका?
नाहीतर पुन्हा मुंबईच्या दिशेनं मोर्चा, मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा सरकारला इशारा