अजित पवार यांच्या गटात झोमॅटो बॉय? नेमकं काय आहे प्रकरण?
अजित पवार गटाने हजारो प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. झोमॅटो बॉय, अल्पवयीन मुलं, काही मृत लोकांची नावं या प्रतिज्ञापत्रात असल्याचा आरोपही केलाय तर दुसरीकडे अजित पवार यांचं आजारपण आणि भेटीगाठींवरूनही संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२३ | अजित पवार गटाने हजारो प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. झोमॅटो बॉय, अल्पवयीन मुलं, काही मृत लोकांची नावं या प्रतिज्ञापत्रात असल्याचा दावा करण्यात आलाय तर दुसरीकडे अजित पवार यांचं आजारपण आणि भेटीगाठींवरूनही संजय राऊत यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून अद्याप वाद सुरूच आहे. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी अजित पवार यांच्या प्रतिज्ञापत्रावर बोट ठेवलं. त्यानंतर जयंत पाटील यांनीही अजित पवार गटाने सादर केलल्या बनावट प्रतिज्ञापत्रावर करावाईची मागणी केली. तर अजित पवार गटाने एकाच जिल्ह्यातून ३२ जिल्हाध्यक्षांचे प्रतिज्ञापत्र, झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे प्रतिज्ञापत्र, गृहिणींच्या नावाने प्रतिज्ञापत्र, पदच अस्तित्वात नसलेल्या पदांची प्रतिज्ञापत्र अशा अनेक गोष्टीवर शरद पवार गटानं बोट ठेवलंय.