गुलाबराव पाटलांनी महाविकास आघाडीत लावालावी करू नये, शिंदेंच्या नेत्यावर कोणाचा हल्लाबोल?

| Updated on: Aug 08, 2024 | 6:39 PM

दोन्ही लोकसभा मतदारसंघाची माजी मंत्री या नात्याने माझ्यावर जबाबदारी होती त्यामुळे दोन्ही ठिकाणी दौरे करून खूप मेहनत घेतली. मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या सोबतच महायुतीचे मंत्री आहेत यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. मात्र त्यामुळे मी भाजपमध्ये जाईल असं नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही.. मी शरद पवार यांचा कट्टर कार्यकर्ता आहे आहे. त्याच पक्षात राहणार आहे, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपावर गुलाबराव देवकरांनी उत्तर दिलंय.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमच्या महाविकास आघाडीमध्ये लावा लावी करायचं काम करू नये, असे म्हणत शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना फटकारलं आहे. मी जर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली असेल तर गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करावे राजकारणातून संन्यास घेईल. तर भाजपला मदत केल्याचा एक तरी पुरावा किंवा उदाहरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दाखवावं हे माझ्या संपूर्ण राजकीय जीवन थांबवतो, असे म्हणत गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांना आव्हान दिलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणूक भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपावर गुलाबराव देवकर यांनी प्रत्युत्तर देत भूमिका स्पष्ट केली आहे.

Published on: Aug 08, 2024 06:39 PM
Paris Olympics 2024 : विनेश फोगटची अपात्रता कायम राहणार की पदक मिळणार? CAS कोर्ट काय देणार निकाल?
आम्ही मनसेचे कट्टर पण त्यांनी आमच्या विठ्ठलाला भेटू दिले नाही… हिंगोलीत मनसैनिकांकडून खदखद व्यक्त