धमक असेल तर…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला अजित दादांचा ‘तो’ सल्ला व्हायरल

| Updated on: Dec 03, 2023 | 12:38 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर अधिकार कसा असू शकतो, असा प्रश्न अजित पवारच उपस्थित करत होते, तोच व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अजितदादांच्या भूमिकेवर सवाल केलाय. ट्वीट करून काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...?

मुंबई, ३ डिसेंबर, २०२३ : शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू असताना एका वर्षाच्या आतच राष्ट्रवादी कुणाची? असा नवा वाद राज्याच्या राजकारणात उभा राहिला. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी या पक्षावर दावा सांगितला आहे. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा ७ महिन्यांपूर्वीचा जुना व्हिडीओ ट्वीट करून त्यांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर अधिकार कसा असू शकतो, असा प्रश्न अजित पवारच उपस्थित करत होते, तोच व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत अजितदादांच्या भूमिकेवर सवाल केलाय. आव्हाड म्हणाले, दादा, तुम्ही राज्याला कायम स्वतःची ओळख करून देताना म्हणतात की, मी शब्द पाळणारा माणूस आहे. शिवसेना फुटल्यानंतर एका भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्रिमंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना सल्ला दिला होता… बघा काय ट्वीट करून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Published on: Dec 03, 2023 12:38 PM
अजितदादांनी केलेल्या ‘त्या’ दाव्यातील शरद पवार यांनी हवाच काढली अन् विश्वासार्हतेवरच केला सवाल
संजय राऊत यांनी विधानसभेच्या निकालावरून काँग्रेस-भाजपच्या विजयाचं काय केलं भाकित?