Jitendra Awhad यांचे डोळे का पाणावले? म्हणाले, ‘कालपर्यंत जे विठ्ठल बोलत होते ते आज …’
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा? यावरून काल केंद्रीय निवडणूक आयोगात पहिली सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. कालच्या सुनावणीवर बोलताना जितेंद्र आव्हाड का झाले भावूक?
मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेमका कुणाचा? यावरून काल केंद्रीय निवडणूक आयोगात पहिली सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कालच्या सुनावणीवर भूमिका मांडण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काल निवडणूक आयोगात माझ्या डोळ्यात अश्रू आले. शरद पवार हे संस्थानिकासारखे पक्ष चालवायचे, ते लोकशाही पद्धतीने वागले नाहीत. त्यांनी हुकूमशाह असं विधान केल्याने मी व्यथित झालो. कालपर्यंत जे विठ्ठल बोलत होते ते आज हुकुमशाह बोलू लागल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचे डोळे पाणावले. तर ते हुकूमशाह आहेत? असे मला महाराष्ट्रातील एका व्यक्तीने सांगावं की शरद पवार हुकूमशाह सारखे वागतात. त्यांनी पक्षात लोकशाही ठेवली नाही, असेही पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले.