भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड संतापले, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Mar 17, 2024 | 1:48 PM

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड हे संतापल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी गळ्यातील पट्टा, गमजा फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई, १७ मार्च २०२४ : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यानचा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जितेंद्र आव्हाड हे संतापल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी गळ्यातील पट्टा, गमजा फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर शिंदे आणि काही कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या जितेंद्र आव्हाड यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Mar 17, 2024 01:48 PM
भाजपच्या वसूली गँगची ईडी सदस्य आणि मोदी त्याचे…संजय राऊतांचा हल्लाबोल
ठरलं? महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटाकडून लोकसभा लढवणार?