अजित पवार भाजपच्या कमळावर लढणार? ‘त्या’ वक्तव्यावर अजितदादांकडून रोहित पवार यांचा बच्चा उल्लेख, म्हणाले…
अजित पवार मित्रमंडळ भाजपच्या चिन्हावर लढणार अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली. तर या टीकेवर बोलताना रोहित पवार बच्चा आहे, असे म्हणत अजित पवार प्रत्युत्तर दिलंय. तर रोहित पवार यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील...
मुंबई, ७ जानेवारी २०२४ : अजित पवार मित्रमंडळ भाजपच्या चिन्हावर लढणार अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली. तर या टीकेवर बोलताना रोहित पवार बच्चा आहे, असे म्हणत अजित पवार प्रत्युत्तर दिलंय. तर रोहित पवार यांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, रोहित पवार याला उत्तर द्यायला तो इतका मोठा झालेला नाही, अशी खोचक टीका अजित पवार यांनी केली. शिंदे गटाला १३ जागा दिल्यात त्यातील ८ खासदार म्हणतात शिंदे गटातून लढायचं नाही. तर भाजपच्या कमळावर निवडणूक लढवायची आहे. तर अजित पवार मित्रमंडळाचे काही लोकं अशाच प्रकारे बोलत आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी असं वाटतंय, दोन्ही पक्षांतील नेते असं बोलताय त्यामुळे त्यांच्या मनात अहंकार जागा झाला असावा. पण त्यांनी तो त्यांच्यापूर्ती ठेवावा आणि महाविकास आघाडीवर त्यांनी काहीच बोलू नये, असेही रोहित पवार यांनी म्हटले. यावरच अजित पवार यांनी हे खोचक प्रत्युत्तर दिलंय.