Rohit Pawar : ’30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..’, रोहित पवारांचा पलटवार
'महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता. कर्जत-जामखेडमध्ये माझ्याविरोधात एक कट रचला गेला होता. त्याचा आम्ही बळी ठरलो, याचा आज प्रत्यय आला आहे.', भाजप आमदारांची टीका
अजित पवार आणि रोहित पवार यांचा कौटुंबिक करार झाला. मी विनंती करूनही अजित पवारांनी सभा घेतली नाही, असा आरोप भाजप आमदार राम शिंदे यांनी अजित पवार आणि रोहित पवारांवर केला. तर माझ्या विरोधात कटकारस्थान रचलं गेल्याचेही राम शिंदे म्हणाले. ‘कर्जत-जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. माझा पराभव हा नियोजित कट होता. राजकीय सारीपाटात माझा बळी गेला’, असं राम शिंदे म्हणाले. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत राम शिंदे हरले होते. तेव्हा त्याचे खापर त्यांनी विखे पाटील यांच्यावर फोडलं होतं. आता अजित पवार हे नवे बळीचा बकरा दिसताय. त्यांच्यावर खापर फोडून कसं तरी मंत्रिपद आपल्याला मिळालं पाहिजे. असा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदेंच्या टीकेवर पलटवार केला. पुढे ते असेही म्हणले की, ३०-४० कोटी रूपये खर्च केलेत, गुंडांचा वापर केला, दडपशाही केली मात्र तरीही पराजय स्विकारावा लागला. त्यामुळे पराभव झाल्याने नैराश्य आलं आणि तेच नैराश्य त्यांच्या मुखातून बोलतंय, असं रोहित पवार म्हणाले.