चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा, अमोल कोल्हे यांची आढळराव पाटलांवर खोचक टीका
अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर खोचक टीका केली आहे. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी आव्हान दिलं त्यांनाच अजित पवार उमेदवार करणार, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवरून अजित पवार यांनाही खोचक टोला लगावला आहे.
पुणे, २० मार्च २०२४ : आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवर खोचक टीका केली आहे. पाच वर्षांपूर्वी ज्यांनी आव्हान दिलं त्यांनाच अजित पवार उमेदवार करणार, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांवरून अजित पवार यांनाही खोचक टोला लगावला आहे. तर अजित पवार यांच्या पक्षातून उभं रहा, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचं आढळराव पाटील म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझं मतही विचारलं त्यावर ते हरकत नसल्याचेही म्हटल्याची माहिती आढळराव पाटील यांनी दिली. तर सर्वांची यादी जाहीर केली जाईल तेव्हा सर्वांची एकत्रित नावं जाहीर करू, असं मुख्यमंत्री शिंदे म्हटल्याचे आढळराव पाटील म्हणाले.
Published on: Mar 20, 2024 05:46 PM