Supriya Sule : ‘आप को जवाब देना पडेगा…’, सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांवर केस करणार? प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Nov 13, 2024 | 1:59 PM

'देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे नॅचरल करंप्ट पार्टी हे राष्ट्रवादीला वारंवार म्हणत असतात, मग असं काय झालं. भ्रष्टाचारमुक्त भारत करायचं म्हणत होतात. त्याच लोकांनी भ्रष्टाचार केला असा देवेंद्र फडणवीसांचा आरोप होता त्याचा अर्थ आम्ही काय काढायचा?', असा सवालच सुप्रिया सुळेंनी केलाय.

सिंचन घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सांगलीमध्ये अजित पवारांनी भाषण केलं. ज्यामध्ये ते असं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना घरी बोलावलं, एक फाईल दाखवली आणि इन्क्वायरी लावायची शेवटची सही त्यावर देवेंद्र फडणवीसांची होती, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पुढे त्या असंही म्हणाल्या, 70 हजार कोटी सिंचनाचे आरोप हे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर केले होते, याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत पुढाकार घेत आरोप करणारे देवेंद्र फडणवीस होते. आरोप झाले इन्क्वायरी लागली, आमचं राज्य गेलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. ज्या व्यक्तीवर, ज्या पक्षावर आरोप केले, त्या व्यक्तीला घरी बोलावून फाईल दाखवता, मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना ती फाईल दाखवली, हे मी म्हणत नाही अजित पवार असं म्हटले, असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Nov 13, 2024 01:53 PM
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या, ‘वैद्यनाथ साखर कारखाना आता…’
Devendra Fadnavis Tweet : ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा…’, बॅग तपासणीवरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला