‘सरकारच्या दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..’, दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

| Updated on: Oct 04, 2024 | 6:12 PM

शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून ट्वीटवर ट्वीट करून सरकारला धारेवर धरताना दिसताय. अशातच रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारच्या दावोस दौऱ्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

‘दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं आणि बिलं उधार ठेवून आलं’, अशा शब्दात शरद पवार गट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. तर आंतरराष्ट्रीय मंचावर राज्याची बदनामी होऊ शकते असेही रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी ट्विट करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिलं उधार ठेवून आलेत, आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे’, असे रोहित पवार म्हणाले. तर महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे उदय सामंत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित यंत्रणेला हा विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत, असे म्हणत खोचक टोला लगावत रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

Published on: Oct 04, 2024 06:11 PM