सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या, ‘चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा…’
मायबाप जनतेच्या लक्षात आलं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे, अदृश्य शक्तीला असं वाटतं की ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्याने दाखवून दिलं की अदृश्य शक्ती ते चालवू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजप जुना पक्ष तरीही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा बाहेरचे लोक असतात, असंही म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भारतीय जनता पक्ष हा किती मोठा आणि जुना पक्ष आहे. तरी आजही त्यांच्या पक्षात टॅलेंट दिसत नाही. सारखं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षातील कार्यकर्ते फोडायचे , त्यांना पक्षात घ्यायचं आणि जेव्हा चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा भाजपच्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याला काहीच मिळत नाही. बाहेरून आलेलेच ताटावर बसतात”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाल्या, काही केलं तरी त्यांना फार यश मिळेल असं वाटत नाही, अशी खोचक टीकाही सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली. इतकंच नाहीतर “महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो? आणि आज कुठे आहोत? एक वर्षांपूर्वीं पक्ष कुठे होता? चिन्ह कुठे होतं? आमदार-खासदार जी, जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष, चिन्ह घेऊन आमचं आयुष्य उध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला मी. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.