नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात, कुठं होणार तगडी टक्कर?

| Updated on: Oct 27, 2024 | 5:19 PM

मुंबईतील अणुशक्ती नगर विधानसभेतील उमेदवारी आज अखेर महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आली आहे. सपाचे युवक प्रदेशाध्यक्ष असलेले फहाद अहमद यांनी नुकताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यानंतर त्यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून आज तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील 9 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. या यादीमध्ये शरद पवार गटाने अणुशक्ती नगरमधून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला अर्थात फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे. फहाद अहमद हे सपामध्ये होते, पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला मुंबईतील अनुशक्ती नगरमधून अजित पवार गट राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर कऱण्यात आली आहे. तर सना मलिक यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना सना मलिकांविरोधात विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फहाद अहमद राजकारणात सक्रिय असून त्यांनी 2022 साली समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.

Published on: Oct 27, 2024 05:17 PM