अजितदादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय झाली दोघांमध्ये चर्चा?

| Updated on: Mar 22, 2025 | 1:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडा शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र... पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार असल्याने चर्चांना उधाण

पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अन् उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र आलेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. मात्र यापूर्वी अजित पवार अजित पवार हे सकाळी साडे आठ वाजता वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. तर पावणे नऊ वाजता जयंत पाटील यांचं याच इन्स्टिट्यूटमध्ये आगमन झालं. यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक झाल्याचे पाहायला मिळाले. साधारण अर्धा तास यांच्याच चर्चा सुरू होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या गटात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या चर्चा खोट्या असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आता शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुण्यात होत आहे. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या बैठकीत शरद पवार-अजित पवार पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्यापूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड अर्धा तास बैठक झाली.

Published on: Mar 22, 2025 01:15 PM
Nashik Video : मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, ‘हॅप्पी होली’ म्हणत दिलं पेटवून अन्…
Supriya Sule Video : काका-पुतण्या एकत्र… सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे…