Sanjay Raut | भाजपला ऐक्य नको, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं : संजय राऊत

| Updated on: Dec 11, 2021 | 4:59 PM

कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला. राऊतांच्या या कवितेला संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतलंच, पण खुद्द शरद पवारांनाही मिष्किल हसत या कवितेला दाद दिली. निमित्त होतं, नेमकचि बोलणे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं. 

जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा पवारांनी 25 वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपला ऐक्य नकोच आहे. ते त्यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी समजलं, असं राऊत यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं त्यांनी सांगितलं. या ग्रंथाला भगवा कलर घातला. मी आपला आभारी आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Jitendra Awhad | भाजप आम्हाला फार लांब नाही, जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला इशारा
Kolhapur | कोणत्याही परिस्थितीत कामावर येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार