Special Report | शरद पवार यांनी भाकरी फिरवली पण पंढरपुरात! कोण लढणार विधानसभा निवडणूक?

| Updated on: May 08, 2023 | 8:49 AM

VIDEO | शरद पवार यांनी भाकरी फिरवली, पंढरपुरातून...सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ मिळणार? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : भाकरी फिरवण्याचे संकेत देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट पंढरपुरात भाकरी फिरवल्याचे समोर आले आहे. उद्योजक अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर शरद पवार यांनी अभिजीत पाटील यांना पंढरपुरातून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. २०२४ साली पंढरपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजीत पाटील असणार हे निश्चित झालं आहे. अभिजीत पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे उद्योजक आहे. बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा चालू करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर ते पवार कुटुंबियांच्या देखील जवळचे आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा होती. अभिजीत पाटील यांच्या पक्षप्रवेशाला सोलापूर जिल्ह्यातील सर्व नेते हजर होते. विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली मात्र लोकसभेसाठीही त्यांचा विचार व्हावा, अशी मागणी रोहित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे केली. बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 08, 2023 08:49 AM