Devendra Fadanvis | शरद पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Oct 13, 2021 | 5:42 PM

फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.

कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

Sharad Pawar | 5 वेळा छापे टाकून काय मिळालं? देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत? : शरद पवार
Dada Bhuse | पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं अर्थसहाय्य; कृषीमंत्री दादा भुसेंची माहिती