Special Report | शरद पवार यांची खेळी; ताई कार्यकारी अध्यक्ष, अजित दादांचं काय?

| Updated on: Jun 11, 2023 | 6:47 AM

VIDEO | सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष पण अजित पवार यांचं काय? शरद पवार यांची नेमकी कोणती रणनीती?

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष पद निर्माण केले असून शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. तर दुसरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागली आहे. तर अजित पवार यांना नेमकं काय. यावर स्वतः अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी मोठी खेळी केली. शरद पवार यांनी ही खेळी करत एक प्रकारे सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपावली. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे दोन कार्यकारी अध्यक्ष नेमले. सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्षा असतील. त्यांच्यावर महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणातील निवडणुकांची जबाबदारी सोपावण्यात आली तर प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष असणार आहेत. याचबरोबर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान झारखंड, गोव्याची जबाबदारी देण्यात आलीये. ही घोषणा शरद पवार यांनी दिल्लीत केली. त्यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या तर अजित पवार उपस्थित होते. नेमकी कोणती रणनिती झाली? बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 11, 2023 06:47 AM
Special Report | ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर घात की अपघात?
‘भाजप शिवसेनेच्या तब्बल 5 मंत्र्यांना हटवणार’, राज्यातील एका बड्या नेत्याचा मोठा दावा काय?