बारामतीचं नेतृत्व बदला, बारामतीकरांना केलं थेट आवाहन; शरद पवार अजित दादांविरोधात मैदानात

| Updated on: Nov 06, 2024 | 11:23 AM

शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांच्या विरोधात उघडपणे नेतृत्वावरून आव्हान उभं केलंय. अजित पवारांनी २५ ते ३० वर्ष नेतृत्व केलं आता नवं नेतृत्व म्हणून युगेंद्र पवारांना संधी द्या, असं आवाहन शरद पवारांनी बारमतीच्या जनतेला केलंय. यावेळी शरद पवारांनी स्वतः च्या संसदीय निवृत्तीचे संकेतही दिलेत.

Follow us on

बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांचं नेतृत्वचं बदलण्याचं आवाहनच केलं. बारामतीमध्ये अजित पवारांनी २५ ते ३० वर्ष कामं केलीत. पण आता पुढच्या ३० वर्षांची कामं करणारं नेतृत्व तयार करायचं आहे. त्यासाठी युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली. त्यासाठी अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना विजयी करण्याचं आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केलंय. ‘सगळी सत्ता ही अजित दादांच्या हातात दिली आणि निर्णय त्यांनी घ्यायचा. त्यांनी २५ ते ३० वर्ष बारामतीत हे काम केलं. त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. आता पुढची तयारी करायची की नाही? आणि ती तयारी करायची असेल तर पुढचं ३० वर्षांचं काम करणारं नेतृत्व इथे तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यामधून आता आम्ही तुम्हाला नवीन नेतृत्व या ठिकाणी तयार करायचं या हेतूने आज या ठिकाणी तरूणाला उमेदवारी दिलीये.’, असं शरद पवार म्हणाले. अर्थात आता बारामतीमधून अजित पवारांचं नेतृत्व बदला, असं आवाहन शरद पवारांनी केलं. बारामतीत यंदा अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे जनता कोणासोबत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे.