पुन्हा इतिहासाची पुन्नरावृत्ती होणार, शरद पवार यांचा मोठा दावा अन् अजितदादांना थेट इशारा

| Updated on: Feb 21, 2024 | 12:51 PM

राज्यातील ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा मोठा दावा शरद पवार यांनी केलाय. तर भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४ : सर्व्हेनुसार राज्यातील ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा मोठा दावा शरद पवार यांनी केलाय. तर भाजपाला विजयाची खात्री नाही म्हणून ते फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचे म्हणत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. दरम्यान, शरद पवार यांनी ५० टक्के जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा करत असताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, काही लोकं सोडून गेले त्याची चिंता नाही तर १९८० मध्ये जे आमदार सोडून गेलेत त्यातील ९० टक्के आमदार पराभूत झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही इतिहासाची पुन्नरावृत्ती होणार असल्याचं भाकित शरद पवार यांनी वर्तविलं आहे, असे म्हणत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना हा इशारा दिला आहे.

Published on: Feb 21, 2024 12:51 PM
इस देश मे रहना है, तो श्रीराम…; नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना सुनावलं
‘मातोश्री’वर बाळासाहेबांच्या खुर्चीसमोर किती शपथ घेतल्या त्यांच्यावर काय विश्वास ठेवताय? राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल