Breaking | शरद पवार-अमित शाह बैठकीत नेमकं काय घडलं?
शरद पवार यांनी दुपारी 2 च्या सुमारास संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत दोघांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धा ही बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अमित शाह या दोघांची वेगळी 15 मिनिटे बैठक झाली. या वेगळ्या बैठकीत ‘वेगळ्या’ विषयावर खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांनी दुपारी 2 च्या सुमारास संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे.