जितेंद्र आव्हाड यांनी निधीच्या मुद्द्यावरून केली अजित दादांची मिमिक्री, म्हणाले…
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली आहे. निधीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची ही नक्कल केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, निधी द्या किंवा नका देऊ, दम द्या काहीही होणार नाही...
नागपूर, २१ डिसेंबर २०२३ : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली आहे. निधीच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांची ही नक्कल केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, निधी द्या किंवा नका देऊ, दम द्या काहीही होणार नाही असं म्हणत त्यांनी अजित दादांची ही मिमिक्री केली आहे. तर पुढे आव्हाड असेही म्हणाले की, आमचे कोणी फुटणार नाहीत. जे कोणी १२ आहेत ते शरद पवार साहेबांच्या प्रेमापोटी आहेत. असे सांगत असताना आम्हाला निधी द्या किंवा नको. तुम्हाला निधीमध्ये असमतोल ठेवायची आहे, असे सांगत खोचक टीकाही केली. दरम्यान महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असेही ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
Published on: Dec 21, 2023 03:36 PM