शरद पवार यांची राजकीय हत्या… अजित पवार यांच्यासह निवडणूक आयोगाचा कट, आव्हाड नेमकं काय म्हणाले?
पर्याय दिले होते मात्र तरीही केंद्रीय निवडणूक आयोग खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओदेखील दाखवला. राष्ट्रवादी वाढवण्यात कोणाचा सहभाग होता? असा सवालही त्यांनी केला.
मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार यांची राजकीय हत्या करण्यासाठी अजित पवार यांच्यासह केंद्रीय निवडणूक आयोगाचा कट असल्याचे विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर पर्याय दिले होते मात्र तरीही केंद्रीय निवडणूक आयोग खोटं बोलत असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओदेखील दाखवला. राष्ट्रवादी वाढवण्यात कोणाचा सहभाग होता? ब्लड आणि लाईफ कोणी दिलं? त्याच उत्तर शरद पवार आहे. ३० तारखेला सही केली असली तरी पक्ष विरोधी कृती ठरते. त्यातून सुटण्यासाठी कमिशनने २०१९ चा मार्ग पकडलाय. इलेक्शन कमिशनच्या निर्णयाला काहीही अर्थ उरलेला नाही. इलेक्शन कमिशन कठपुतली आहे, असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
Published on: Feb 07, 2024 03:16 PM